कवी,संपादक संतोष सावंत यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार
आयकर भवन मुंबई आयोजित शामियाना हॉल मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी सांगता सोहळा व बक्षीस समारंभ होता. यावेळी नृत्य आविष्कार कार्यक्रम झाला. त्याच वेळी बक्षीस समारंभ व मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी अभिनेता अशोक सराफ, अभिनेता संजय खापरे,सौ.राजश्री काळे,सौ.पूजा काळे, प्रधान मुख्य आयकर आयुक्त श्री. संजय कुमार, आयकर आयुक्त प्रशासन, टि. पी.एस,श्री. विनय सिन्हा यांच्या उपस्थितीत "लोकसत्यवाणी न्यूज" व साप्ताहिक "स्नेहसंयोग"चे संपादक संतोष सावंत यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.



0 टिप्पण्या