ओतूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र ओझर ( गणपतीचे ) येथील श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे ज्येष्ठ पत्रकार सुभाष आनंदराव हांडे देशमुख यांची पुतणी आणि राजेंद्र आनंदराव हांडे देशमुख यांची सुकन्या अंकिता हिचा विवाह सिन्नर येथील राजेंद्र बबनराव देशमुख ( काळे ) यांचा सुपुत्र अक्षय यांचेशी दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.
पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पडलेल्या या भव्य अशा लग्नसोहळ्यात वधूवरांस आशीर्वाद देण्यासाठी जुन्नर तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. गंगाराम बुवा डुंबरे, ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर देव - धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिलशेठ श्रीकृष्ण तांबे, ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ गोविंद झुंजारराव, सचिव सुनील पांडुरंग देशमुख, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लि. या भारत सरकारच्या खत उद्योगातून सेवानिवृत्त झालेले कार्यपालक संचालक (विपणन) रा. ह. पवार, राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू राजा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रवींद्र करमळकर व त्यांचे सहकारी, ठाणे जिल्ह्यातील काराव येथील महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार प्राप्त दिलीपराव बाबाजीराव देशमुख, मुरबाड येथील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर आणि समाजसेवक जयवंत विनायक सूर्यराव, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील माध्यमिक विद्यालय मुंदखेडे संस्थेचे मुख्याध्यापक शांताराम जी. पाटील व शिक्षक वृंद, ओतूर येथील ग्राम विकास मंडळ, कपर्दिकेश्वर देव - धर्म संस्था, श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा, जय बजरंग प्रतिष्ठाण या संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सदस्य व सभासद, चैतन्य विद्यालय ओतूर, सरस्वती विद्यालय उदापूर, पुष्पावती विद्यालय डिंगोरे, या शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
त्याचप्रमाणे परिसरातील अनेक मान्यवरांनी, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून वधू वरांस आशीर्वाद दिले.
------------------------------------
प्रेषक :
सुभाष हांडे देशमुख
नेरुळ (ओतूर)



0 टिप्पण्या