जे एम एफ शिक्षण संस्थेत सजली अयोध्या नगरी.पताका, दुदुंभी ने निनादली शरयू नदी तीरी.
ज्या दिवसाची, ज्या क्षणाची करोडो भारतवासी आतुरतेने वाट बघत होते तो दिवस, तो क्षण अखेरीस ५५० वर्षांनी आला आणि असंख्य भारतवासियांचे डोळ्याचे पारणे फिटले.
असाच सोनेरी दिवस म्हणजेच २२ जानेवारी २०२४, शुद्ध द्वादशी,मृगशिर्ष नक्षत्र ब्रह्मा योग ह्या शुभ मुहूर्तावर आमच्याही जे एम एफ संस्थेमध्ये ' रामलल्ला ' च्या बालरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ राजकुमार कोल्हे व त्यांच्या सुविध्य पत्नी व संस्थेच्या सचिव माननीय डॉ प्रेरणा कोल्हे यांच्या कर कमलाने प्रस्थापित झाली.
न भूतो , न भविष्यती असा हा सोहळा पाहण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, असंख्य पालक वर्ग, शिक्षक, आवर्जून उपस्थित राहिले होते.
साक्षात अयोध्या नगरीतील श्रीरामाच्या मंदिराची ब्रह्मा रांगतालय येथे हुबेहूब प्रतिकृती श्री .विठ्ठल कोल्हे यांनी साकारली होती. श्री.पिसाट यांनी मंदिराच्या शेजारीच वाहती शरयू नदी साकारण्यात आली.
शाळेतील आमचे छोटे विद्यार्थी ,विद्यार्थीनी राम ,लक्षण, सीता ,हनुमान आणि सर्व रामायण मधील व्यक्तिरेखा च्या वेशभूषे मधे आले होते. सर्वात प्रथम शाळेच्या फाटकातून राम ,लक्षण, सीता हनुमान आणि सर्व व्यक्तिरेखा यांचे कोल्हे दंपत्यांनी त्यांचे पाय प्रक्षाळून व आरती ओवाळून ,फुलांच्या पायघड्या घालून, ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.
जय श्रीराम,जय श्रीराम ह्या नाद घोषानी शाळा दुमदुमून गेली.अंगावर शहारा आणणारे हे दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यात भावनिक आणि आनंदी अश्रूंची जणू धारा वाहू लागल्या.जे एम एफ मंडपम्, मधुबन वातानुकुलीत दालन येथून मिरवणूक काढून थेट ब्रह्मा रंगतालय येथे साकारण्यात आलेल्या मंदिरामध्ये राम, लक्षण सीता हनुमान ह्यांना फुलांचा वर्षाव करत आगमन झाले.
रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीला निषाद रानडे ह्या इयत्ता नववी मधील विद्यार्थ्याने वेद मंत्र उच्चारून कोल्हे दाम्पत्य व त्यांचा कन्या जान्हवी कोल्हे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
" निरागस हे बालरूप पाहून हरपले चित्त
राम नामाच्या जपामध्ये तल्लीन झाले सारे भक्त "
संपूर्णतः आठ मजली इमारतीवरून फुलांचा वर्षात होत होता. हे विलोभनिय दृश्य पाहून शरयू नदीला देखील बांध फुटला व ती ही आनंदाश्रुनी खळा खळा वाहू लागली.
कुणी म्हणे माझा राम आला, कुणी म्हणे माझा कैवारी आला.
रामाभिषेक चालू असतानाच इयत्ता सातवी ,आठवी च्या विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर करून श्रीरामाला अभिवादन केले.त्यानंतर श्रीरामाच आरती करण्यात आली.
सुमारे ५५० वर्षांनी हा मणी कांचन योग जुळून आला आणि सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले.अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी एकवचनी ,मर्यादा पुरुषोत्तम, रामाचे चरित्र हे एका शब्दात मांडण्यासारखे नाही तर त्यासाठी असंख्य जन्म अपुरे पडतील असे सांगून श्रीरामा सारखे निष्ठावान आणि आज्ञा धारक राहा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्रीराम हा आपल्या मनामनात, कणाकणात आहे ,तो कुठेच गेला नव्हता आणि नाहीये असे सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगून ,मनाने पवित्र रहा, आणि श्रीरामा प्रमाणेच सत्याचा मार्ग धरा असे प्रोत्साहन दिले.
कोल्हे दाम्पत्य आणि त्यांच्या कन्या खजिनदार जान्हवी कोल्हे ह्यांच्या हस्ते तसेच सर्व पाहुणे, पालक व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी शरयू नदीची आरती केली.
सर्व शाळा ही सर्व कलात्मक शिक्षिका व पालक यांनी सुबक रांगोळ्या काढून सजवली होती.
" याची देही याची डोळा , पाहिला राम उत्सव सोहळा
रामलल्लाच्या आगमनाने
पावन झाली जे एम एफ शाळा."
शब्दांकन .सौ.श्रेया कुलकर्णी
(संगीत शिक्षिका)





0 टिप्पण्या