आयकर भवन मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा चे दणक्यात उद्घाटन !
आयकर भवन मुंबई येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त श्री संजय कुमार प्रधान आयकर आयुक्त (मुंबई), श्री विनय सिन्हा आयकर आयुक्त (टि. पी. एस.), श्री सौरभ देशपांडे अतिरिक्त आयकर आयुक्त (प्रशासन मुख्यालय), प्रमुख पाहुणे डॉ. जे. आर. केळुसकर माजी शिक्षण अधिकारी (महाराष्ट्र राज्य), आणि स्वप्नील राणी नंदकुमार (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त सुप्रसिध्द वक्ते - लेखक व संपादक) ह्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आणि त्या नंतर, प्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री एकनाथ धयाळकर यांनी स्वागत गीत सादर केले. आणि त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला.
https://youtu.be/DCxTP7_Vtwc?si=ro1VaFnw5mwAzN0L
प्रमुख पाहुणे मा. श्री केळुसकर यांनी मराठी भाषेची सुरुवात, पुरातन काळापासून कशी झाली. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली. याचे उदाहरण देत देत ते आतापर्यंतचे सांगत असताना, त्यांनी काव्यही सादर केले. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे मा. श्री स्वप्नील राणी नंदकुमार यांनी मराठी भाषा ही, १५ कोस अंतरावर भाषा कशी बदलते. त्यात, त्यांनी नागपूरी- कोल्हापूरी- पुणेरी भाषेची मजेशीर किस्से सांगितले. आणि मराठी भाषा, हि इतर भाषेला कशी सांभाळून घेते, हे मराठी भाषेचं महत्त्व पटवून सांगितले. मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त मा. श्री संजय कुमार यांनी तर, चक्क मराठीतच भाषण करुन, उपस्थितांचे मन जिंकून घेतले. आणि सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त केला. आणि त्यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमाला आयकर कर्मचारी महिला व पुरुष मराठी आणि इतर भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ह्या कार्यक्रमाला आयकर विभाग स्थानीय लोकाधिकार समितीचे सहकार्य लाभले. ह्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री प्रमोद वाघे यांनी करत असताना, पुढील पंधरवडा कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले. आणि सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.


0 टिप्पण्या