- श्रीम. संतोषी बांगर यांना "शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रदान



 - श्रीम. संतोषी बांगर यांना "शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रदान


 मुंबई- दि.१२, संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या मैत्रा फाऊंडेशन, बीड यांच्यावतीने शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणा-या मान्यवरांना दरवर्षी राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

    मैत्रा फाऊंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील  सर्वोच्च व मानाचा समजला जाणारा असा हा राज्यस्तरीय "शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार - २०२३" हा पुरस्कार सहा.शिक्षिका श्रीम. संतोषी संपत बांगर यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करून त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

       याबाबत सविस्तर वृत्त असे की, सौ.संतोषी संपत बांगर ह्या भांडुप (प.) येथील गायत्री विद्यामंदिर प्राथमिक विभाग, तुळशेतपाडा येथील शाळेत गेली २७ वर्षे कार्यरत होत्या. सन - २०२१ मध्ये पटसंख्या कमी झाल्यामुळे त्या अतिरिक्त होऊन दीड वर्ष पवई येथील मुंबई मनपाच्या तिरंदाज व्हिलेज लो.प्रा. मराठी शाळेत कामगिरी तत्वावर कार्यरत होत्या. परंतु पुन्हा बदली होऊन  सद्यस्थितीत त्या बी.पी ई.एस, भांडुप (प) या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कामगिरी तत्वावर  कार्यरत आहेत.

       त्यांनी आपल्या या शैक्षणिक कारकिर्दीत विद्यार्थ्यासाठी अनेक नाविण्यपूर्व उपक्रम राबवून शालेय गुणवत्ता वाढविली आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण, नवनवीन व्हिडीओ निर्मिती, तंत्रस्नेही शिक्षणावर भर असे विविध प्रकारचे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सण- उत्सवांबाबत विविध  प्रकारचे उपक्रम राबवून जनजागृतीही निर्माण केली व सणांचे महत्त्वही पटवून दिले आहे. गरजू व गरीब  विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदतसुध्दा केली. 

      श्रीम. संतोषी बांगर यांना काव्यलेखनाची देखील आवड आहे. अनेक कवितांचे लेखन केले आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य कलेची दखल   घेऊनच मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक श्री.द.ल.वारे सर, श्रीम. हर्षा ढाकणे मॅडम, जिल्हाध्यक्ष संजय राठोड, उद्धव बडे यांनी त्यांची निवड केली आहे.

    श्रीम. संतोषी बांगर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल  सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

गायत्री विद्यामंदिर, भांडुपच्या संचालिका श्रीम. महाश्र्वेता चव्हाण, सेक्रेटरी श्री. प्रमोद तळेकर,  मुख्याध्यापक श्री. बाविसकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम . विद्याश्री मांजरेकर, सह.शिक्षिका श्रीम. वंदना मोरे व इतर कर्मचारी वर्ग  तसेच सदैव माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे माझे यजमान श्री. संपत बांगर, माझ्या कामाचे सतत कौतुक करणा-या तिरंदाज व्हिलेज लो.प्रा.मनपा शाळेच्या इन्चार्ज श्रीम. सिद्धिका गावडे, सतत प्रोत्साहन देणा-या प्रशिक्षिका श्रीम.सुधा चव्हाण तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय कर्मचारी सेना शिक्षण विभागाचे   सरचिटणीस आणि मुंबई मनपाचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.संदीप परब, के.एम.एस ग्रूप आणि बी.पी.ई.एस. इंग्लिश हायस्कूल, भांडुप यांच्याकडूनही विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे. 

      श्रीम. संतोषी बांगर यांनी त्यांना दिलेल्या सन्मानाबद्दल मैत्रा फाऊंडेशन, बीड यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या