'नवरी जिंकून नेईन ' या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली



प्रतिनिधी : 12:डिसें 2023 रोजी 62 व्या राज्य नाट्य स्पर्धेत श्री गणेश एज्युकेशन सोसायटीचे प्रेम जाधव लिखित दिग्दर्शीत नवरी जिंकून नेईन हे नाटक आचार्य अत्रे कल्याण नाट्यगृहामध्ये  प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत  संपन्न झाले. नाटकाचे प्रकाश योजना कपिल नाईक यांची असून संगीत  समर्पक प्रेम जाधव - चैतन्य कांबळे  होते. यांचे असून दीपक घाग, अक्षता दातखीळ, प्रशांत घोरपडे, आनंद जाधव, रेश्मा थळे ,योगेश मुंडे, ऋतुराज खैरनार, गणेश वाघमारे यांनी बॅकस्टेज  चांगले सांभाळले.नेपथ्य निर्मिती संदीप पांडुरंग कोळी यांची प्रभावी ठरली.   वेशभूषा व रंगभूषा सुवर्णा जाधव व अक्षता दातखीळ ह्यांची प्रभावी ठरली. वैष्णवी पाटील व एकनाथ चौधरी सर यांनी त्यांना चांगली साथ दिली.हे नाटक वर- वर हलके फुलके वाटत होते, पण एका  भूमिपुत्राच्या गंभीर विषयाला हात घेतला गेला आहे. आगरी -कोळी संस्कृती, आगरी पोशाख यावर भाष्य करून आपल्या जुन्या परंपरा कश्या चांगल्या आहेत. हे या नाटकातील नायक गज्या (प्रेम जाधव) याच्या तोंडून वदवल्या आहेत. या नाटकाची नायिका सोनिया (अबोली जाधव) हिच्या लग्नाची गोष्ट म्हणजे नवरी जिंकून नेईन हे नाटक होय.अबोलीच्या अभिनयची सुद्धा छाप पडली आहे.प्रेम जाधव यांनी लेखन दिग्दर्शनाबरोबर, अभिनय ,संगीत,  नृत्य, या एवढ्या सगळ्या भूमिका लिलया पेलल्या. अमोद वैद्य व मीनाक्षी पाटील यांच्या पोलिसांच्या भूमिका नाटकाला चार चांद देतात. सतत हशा..टाळया. त्यांनी घेतल्या.शिवाय गज्याच्या भावनिक स्वगताने प्रेक्षकांना क्षणभर रडवले सुद्धा.  प्रबुद्ध जाधव, चैतन्य कांबळे कलाकार सुद्धा चमकून दिसले.एकंदरीत नवरी जिंकून नेईन या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या