भारतीय बौद्ध समाज एकता अभियान सेवा समितीच्या सल्लागारपती प्रभाकर कांबळे यांची निवड

 भारतीय बौद्ध समाज एकता अभियान सेवा समितीच्या सल्लागारपती प्रभाकर कांबळे यांची निवड


मुंबई (प्रतिनिधी.) विक्रोळी येथील ज्येष्ठ समाजसेवक व पत्रकार, गुणवंत कामगार ,विशेष कार्यकारी अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे यांची भारतीय बौद्ध समाज एकता अभियान सेवा समितीच्या सल्लागार पदावर समितीचे अध्यक्ष भंते धम्मराज यानी लेखी पत्रकार द्वारे निवड पत्र देऊन केले असल्याचे आमच्या  प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..

        ईशान्य मुंबई पूर्व उपनगरात भारतीय बौद्ध समाज एकता अभियान सेवा समितीची स्थापना सन 2015 मध्ये भंते  धम्मराज यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून सचिव पदावर पी.के धीवार उपसचिव आतिश तुपे उपाध्यक्ष दादासाहेब झेंडे खजिदार पदावर आरपीआय नेते प्रभाकर कांबळे उपखजिनदार संतोष बर्वे ,नागोराव वाव्हळे उत्तम आहेरे श्रीमती सखुबाई जोगदंड आदी पदाधिकारी यांची ही निवड करण्यात आली असून मुंबई पूर्व उपनगरातून सर्वांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या