श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सविता अविनाश पाटील.
मुंबई (प्रतिनिधी ) भांडुप कांजूरमार्ग मधील श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापक समितीच्या पंचवार्षिक निवडणूक सन 2023 ते2028 या कालावधी करिता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रताप पाटील व निवडणूक निर्णय अधिकारी/अध्यासी अधिकारी अरुण चौगले यांच्या अधिपत्याखाली बिनविरोध निवडणूक पार पडली असून सौ .सविता अविनाश पाटील यांची अध्यक्षपदी तर ज्ञानदेव तुकाराम पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच शंकर दळवी. अमोल थोरात, बाळू थोरात, प्रमोद तांडेल, वैभव लाळगे यांची संचालक पदी तर श्रीमती समीक्षा नागवेकर, वैशाली पाटील, कोमल बुरोडकर,कुमारी काव्या अविनाश पाटील यांची संचालिका पदावर एकमताने निवड करण्यात आली असून संस्थेचे संस्थापक अविनाश पाटील व प्रामाणित लेखापरीक्षक, गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले असून या सर्वांचे मुंबई पूर्व उपनगरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या