नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयातर्फे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा


 नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयातर्फे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी ( नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख:


नवी मुंबई : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयातर्फे रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून "वाचन प्रेरणा दिन "  नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या श्री गणेश सभागृहात, प्रकाश लाखापते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती वृंदा  परुळेकर लाभल्या होत्या. प्रसंगी  किरण देशपांडे, रुग्णसेवेचे अध्यक्ष रणजीत दीक्षित,  विजय सावंत , यूथकौन्सिलचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख, ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव अजय माढेकर, ग्रंथपाल रुपाली माहुलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप  प्रज्वलनाने झाली. यानंतर रमेश गायकवाड व श्री. राजूरकर यांनी महाराष्ट्र राज्यगीत गायले. संस्थेचे सचिव सुनील आचरेकर यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले. श्रीमती सीमा आगवणे यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती वृंदा परुळेकर अर्थात "दीप लक्ष्मी" यांचा परिचय करून त्यांचे स्वागत केले. 


संस्थेचे कार्याध्यक्ष विकास साठे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात निर्मिती शक्ती अर्थात आदिशक्ती त्यानिमित्त सुरू असलेला शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ग्रंथालय राबवित असलेल्या विविध उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. वाचन प्रेरणा दिना निमित्त वाचन संस्कृती वाढावी म्हणून ग्रंथालय पारंपरिक दृष्टिकोन बदलून वाचकापर्यंत  पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. असं सांगून ते म्हणाले की, आजची युद्धग्रस्त जगाची परिस्थिती पाहिल्यास  सुसंस्कृत समाजाची जडणघडण करण्यासाठी ग्रंथाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी ग्रंथालय जगली पाहिजेत , ग्रंथालये वाढली पाहिजेत, वाचकांनी ग्रंथालयात आलं पाहिजे आणि त्यांच्या मनाची मशागत झाली पाहिजे . तरच सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडून देश समृद्ध होऊ शकतो.  वाचनाने माणसाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात आणि माणूस घडवण्यात पुस्तकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.



 प्रमुख वक्त्या श्रीमती वृंदा परुळेकर यांनी डॉक्टर ए.पी.जे.  कलाम यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला व त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले तसेच त्यांना जगातील प्रमुख विद्यापीठाकडून ४८ मानद डॉक्टरेट देण्यात आल्या असे सांगितले. एका नावाड्याच्या मुलापासून ते भारताचे ११ वे राष्ट्रपती पदापर्यंतची त्यांची वाटचाल आश्चर्यकारक होती. त्याचप्रमाणे "मिसाईल मॅन "आणि जनसामान्यांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती.



 अध्यक्षीय भाषणात  प्रकाश लखापते यांनी "वाचन प्रेरणा दिन " का साजरा करायचा आणि कसा साजरा करायचा याविषयी थोडक्यात कथन केले. सुचित्रा कुंचमवार आणि किरण देशपांडे यांनीही आपल्या छोटेखानी भाषणात डॉक्टर ए. पी. जे. कलाम यांच्या कार्याचा गौरव केला


 संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती सीमा आगवणे यांनी उपस्थित श्रोत्यांचे व  प्रमुख वक्त्यांचे  मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाचे नीट नेटके सूत्रसंचालन ग्रंथालयाचे सचिव  सुनील आचरेकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या