तापी पतपेढीच्या डोंबिवली शाखेतील ५ कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा


तापी पतपेढीच्या डोंबिवली शाखेतील ५ कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा


ठाणे - जिल्ह्यातील चोपडा येथील तापी सहकारी पतपेढीच्या डोंबिवली शाखेतील  कामावरुन कमी केलेल्या पाच कर्मचार्‍यांना ठाणे येथील औद्योगिक न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.या पाचही कर्मचाऱ्यांचा २०१६ पासूनचा थकलेला पगार आणि लॉकडाऊनमधील पगार सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत.


न्यायालयाने दिलासा दिलेल्या कर्मचाऱ्यांची नावे-जितेंद्रसिंग पाटील, संजय माळी,योगेश्वर बोरोले,

शरद जगताप आणि धनश्री चौधरी अशी आहेत.तापी पतपेढीच्या डोंबिवली शाखेत काम करणाऱ्या पाच कर्मचार्‍यांना २०१६ पासून पगार दिला नव्हता.तसेच आर्थिक कारण पुढे करत कामावरून कमी केले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील कामगार न्यायालयात २०१९ मध्ये व्यवस्थापनाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कामावर घेऊन ५० टक्के पगार देण्याचे आदेश दिले.त्यानंतर पतपेढी व्यवस्थापनाने त्यांना कामावर घेतले पण पगार दिला नाही.तसेच लॉकडाऊनमध्ये तीन कर्मचार्‍यांची जाणूनबुजून बदली केली आणि दोघांना कामावर न घेता बाहेर ठेवले. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी 

आपल्यातील अन्यायाबाबत ठाणे औद्योगिक न्यायालयात दाद मागितली.या कर्मचार्‍यांच्या बाजूने अ‍ॅड सुनील पाटील यांनी युक्तिवाद केला.यावेळी ठाणे औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. गणोरकर यांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेऊन व्यवस्थापनाची बाजू खोटी असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच या कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार आणि काम केलेला लॉकडाऊनमधील पगार सहा टक्के व्याजासह देण्याचा ऐतिहासिक आदेश दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या