विक्रोळी भांडुप एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय पोषण आहाराबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती व पोषण माहे सप्टेंबर 2023 चा सांगता सोहळा संपन्न.
मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनांच्या विक्रोळी भांडुप नागरी प्रकल्पाच्या वतीने सेक्टर एक मधील कन्नमवार नगर व टागोर नगर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. हेमा काटकर व मुख्य सेविका/पर्यवेक्षिका श्रीम. नंदिता काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी केंद्राच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अथक परिश्रमाने माहे सप्टेंबर 2023 या संपूर्ण महिनाभर राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत बालकांचे पोषण, आहार दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच कुपोषणाला आळा घालण्यासाठी बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आहार, स्वच्छता, आरोग्य संबंधी जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विक्रोळी रेल्वे स्टेशन ,विक्रोळीतील शाळा, कॉलेज, भाजी मार्केट, फळ मार्केट, गणेश मंडळाच्या मंडपात जाऊन पथनाट्य सायकल रॅली ढोलकीच्या तालावर " सही पोषण देश रोशन " घोषणा देत ॲनिमिया रोगाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली या दृष्टीने गृहभेटी देऊन स्वच्छ परिसर पिण्याचे पाणी व हिरव्या पालेभाज्यांचे महत्व, लसीकरण, पाककृती स्पर्धा, संतुलित आहार, ॲनिमिया, पोषण घटकांची कमतरता, या विषयावर चर्चासत्र, खाजगी व शासकीय शाळांमध्ये पोषण विषयावर वादविवाद व वकृत्व स्पर्धा, " मेरी माटी मेरा देश " अंतर्गत पोषणाची शपथ, बचत गट महिलांना संतुलित आहाराचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच साफसफाई कामगार, हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांसोबत पोषणावर मार्गदर्शन, किशोरी मुलींकरिता कौशल्य, विकास केंद्रांना भेटी, तसेच किशोरी मुलींसाठी डॉ.योगेश भालेराव यांच्या मदतीने आरोग्य तपासणी कॅम्प करण्यात आले. पथनाट्याच्या माध्यमातून पोषण आहाराची जनजागृती करण्यात आली.
तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या वतीने अंगणवाडी क्रमांकासह प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो डॅशबोर्ड वर टाकण्यात आले. राष्ट्रीय पोषण जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रोळी भांडुप नागरी प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका श्रीम.नंदिता काळभोर व सर्व सेविका ,मदतनीस यांनी विशेष मेहनत घेऊन " प्रत्येक घर पोषण सही पोषण ,देश रोशन," अशाप्रकारे अनेक घोषणा देत "राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान " माहे सप्टेंबर 2023 चा सांगता समारोह कार्यक्रमात हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेले कडधान्य, फळभाज्या व पोस्टर द्वारे आहाराचे प्रदर्शन भरवण्यात आले असून या सांगता समारोप कार्यक्रमाला बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम .हेमा काटकर मुख्य सेविका श्रीम. नंदिता काळभोर, श्रीम.सरला महाजन व श्रीम .सुषमा करमळकर, मनसेच्या नेत्या ऍड .प्रांजल जाधव, प्रिया साळवी, प्रेरणा ओव्हाळ , सुमन राघव व ज्येष्ठ समाजसेवक डॉ .योगेश भालेराव, तक्षशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष उदय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सकस आहारासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या असून संपूर्ण देशभर पोषण अभियान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आल्याचेही यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.हेमा काटकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
तसेच मनसे महिला आघाडीच्या नेत्या ऍडव्होकेट प्रांजल जाधव यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भेटवस्तू देऊन सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला अंगणवाडीतील मुले, किशोरवयीन मुली व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने " राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
0 टिप्पण्या