सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आणि सिंधुवैभव साहित्य समूह यांचा उपक्रम.
" प्रकाश असेल नसेल म्हणून थांबू नकोस,
दगडावर बी पेरायची तयारी ठेव "
असे अत्यंत प्रयत्नवादी शब्द लिहिणारे कोकणचे प्रख्यात दिवंगत कवी आ सो उर्फ आबा शेवरे यांचा सातवा स्मृतिदिन या 26 ऑक्टोबर रोजी आहे. यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी प्रसंवादचे संपादक अनिल जाधव यांचे आ सो शेवरे यांची कविता " या विषयावर ऑनलाईन व्याख्यान "सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान" आणि " सिंधुवैभव साहित्य समूह " यांनी आयोजित केले आहे.
आबा शेवरे हे कोकणचे परिवर्तन कवितेचे जनक असून त्यांचे गंधारीची फुले, दफनवेणा, झिरो balance चे माझे पासबुक हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे 2016 साली निधन झाले. त्यांच्या प्रतिभेची जाग समाजात निरंतर राहावी या भावनेने हे व्याख्यान आयोजित केलेले आहे.
अनिल जाधव हे पेशाने अभियंता असून प्रसंवादचा संपादक म्हणून जबाबदारी पार पडताना अनेक माध्यमातून ते सामाजिक प्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता व बंधुता या विचारधारेचा पाठपुरावा करत आहेत.
सदर व्याख्यान 26 ऑक्टोबर रोजी फेसबुक आणि यूट्यूब वर प्रसारित केले जाईल.
शुभांगी पवार.
स्नेहा राणे सरंगले.
0 टिप्पण्या