५ सप्टेंबर हा भारतीय इतिहासातील सर्वश्रुत प्राधान्य असणारा शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पाहिले उपराष्ट्रपती ,तत्वज्ञ व शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् ह्यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दीन साजरा केला जातो.
आमच्या जे एम एफ संस्था अंतर्गत शाळा ,कॉलेज मधे देखील शिक्षक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मोठ्या वर्गातले इयत्ता नववी , दहावी चे विद्यार्थी ,विद्यार्थिनी शिक्षक बनून आले होते व त्यांनी शिशुविहार ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आज शिकवले.एक दिवस आपले आवडते शिक्षक होण्याचा आनंद त्यांना मिळाला.
अतिशय उत्साहाने त्यांनी मराठी, संगीत ,इतिहास, भूगोल ,PT असे विषय शिकवून मुलांची मने जिंकली.
त्याचबरोबर मधुबन वातानुकुलीत दालनामधे देखील मोठ्या प्रमाणात शिक्षक दीन साजरा करण्यात आला.जे एम एफ संस्थेचे सर्वेसर्वा आचार्यमहोदय डॉ राजकुमार कोल्हे सर, सचिव डॉ प्रेरणा कोल्हे मॅडम, खजिनदार जान्हवी कोल्हे मॅडम ह्यांच्या उपस्थितीत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,ह्यावेळी सर्व शाळा कॉलेज चे शिक्षक ,शिक्षिका, मुख्याध्यापक , उपमुख्याध्याक ह्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
शिक्षक कसा असावा ,तर ज्या प्रमाणे सोन्याला चकाकी येण्यासाठी त्याला तप्त निखाऱ्यात टाकावे लागते मगच त्याचे तेज उजळून निघते , त्याचप्रमाणे शिक्षकाला देखील त्याचे बौद्धिक तेजाचा प्रकाश पसरविण्यासाठी अज्ञान रुपी अंधाराच्या मार्गातून खडतर प्रवास करूनच ज्ञानाचा प्रकाश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतो ,असा तो हाडाचा शिक्षक म्हणणे सार्थ ठरेल असे डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले. स्वतः डॉ राजकुमार कोल्हे सर हे सर्वप्रथम शिक्षक आहेत व शिक्षकी पेशा हा अतिशय मानाचा आणि आदराचा जॉब आहे असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना भेटवस्तू देऊन सदिच्छा दिल्या. मैत्रेयी अनुयायी भगिनी यांनी सर्व उपस्थित असलेल्या शिक्षकांची ध्यानधारणा घेऊन मनोबल वाढवले.
पदवीधर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री. नाडर सर यांनी नवीन पदावर रुजू झाल्याने सर्वांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून मिष्टान्न चा भोग दिला.


0 टिप्पण्या