कै. ग.ग.शिक्षण मंडळाच्या गावदेवी शाळेत शिक्षक दिन जल्लोषात साजरा


कै.  ग.ग.शिक्षण मंडळाच्या गावदेवी शाळेत शिक्षक दिन जल्लोषात साजरा

      (वृतांकन :प्रा मगन सुर्यवंशी, डोंबिवली)

  आज मंगळवार दिनांक 5/9/2023 रोजी गावदेवी विद्यामंदिर शाळेच्या आवारात शिक्षक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावदेवी विद्या मंदिराचे संस्थाचालक शिक्षण महर्षी माननीय श्री केशव भोईर सर व्ही. के. भोईर कॉलेजच्या संचालिका सौ. वैशाली भोईर मॅडम ,स.है.जोंधळे शाळेचे माजी प्राचार्य श्री मगन सूर्यवंशी सर ,व्ही के भोईर कॉलेजचे प्राध्यापक श्री तुषार भोईर सर ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री घावट सर ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री भोईटे सर ,पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.गाळणकर मॅडम,  पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागाचे सर्व विद्यार्थी,शिक्षक वृंद, माध्यमिक विभागाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी स्वागत गीतातून केले


या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिक्षण महर्षी केशव गजानन भोईर यांची निवड करण्यात आली तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री मगन सूर्यवंशी सर ,मा.श्री तुषार भोईर सर व रॉय सर सौ.वैशाली भोईर मॅडम यांची निवड करण्यात आली.


सर्वांचे संस्थेतर्फे श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच शिक्षक, कर्मचारी वृंदाचा भेटवस्तू व श्रीफळ शाल देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.                      मुख्याध्यापक श्री घावट सर यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक राजकीय साहित्यिक कार्या विषयी माहिती सांगून शिक्षकांचे महत्त्व व शिकक्षकाची भूमिका याविषयी माहिती सांगून, गुरुजनांचा सत्कार का करावा . आज 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा करतात ?याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मगन सूर्यवंशी सर यांनी काव्यपंक्तीतून शिक्षकांच्या कर्तव्याची व त्यांच्या सन्मानाची माहिती दिली .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री तुषार सर यांनी शिक्षकाचे ज्ञानदान त्याचा उपयोग जीवनात कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिक्षण महर्षी केशव भोईर यांनी सत्ययुगापासून चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरे विषयी माहिती सांगून विद्यार्थी शिक्षक हे आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण समाजात बदल घडवून आणू शकतात याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री सुभाष पाटील सर यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांची निवड श्रीमती वळवी मॅडम व त्यांच्या निवडीस अनुमोदन सौ .राजपूत मॅडम यांनी दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय श्री होले सर यांनी करून अध्यक्षांच्या अनुमतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या