नेरुळ येथील भिमाशंकर वसाहतीत भगवान शंकराची प्रतिष्ठापना.
प्रतिनिधी (नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख
नवी मुंबई मधील नेरुळ उपनगरातील भिमाशंकर सामाजिक संस्थेच्या विद्यमाने श्रावणी सोमवार दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी भीमाशंकर सोसायटीत भगवान शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अजय भोसले (पी.आय.) व राहुल इथापे यांच्या शुभहस्ते विधीपूर्वक करण्यात आली. याप्रसंगी सभागृह नेते रविंद्र इथापे व मा.नगरसेविका सौ. सुरेखा इथापे यांनी सपत्नीक मंदिरात अभिषेक केला. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग (तात्या) डुंबरे, अध्यक्ष म. म. नायकोडी, सचिव लक्ष्मण कोरडे तसेच सोसायटीचे सचिव संजय चव्हाण, संचालक अशोकशेठ हिंगे, दत्ताशेठ नलावडे, विश्वनाथ गावडे, श्रीकांत ढमडेरे, मारूती गोरडे, माऊली शेळके व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व कार्यक्रम विधीवत व शोडशोपचारे उत्साही वातावरणात करण्यात आले.

.jpeg)

0 टिप्पण्या