उमरखाडी गोकुळ काळा मंडळाच्या गोविंदांची दहीहंड्या फोडत मिरवणूक


 उमरखाडी गोकुळ काळा मंडळाच्या गोविंदांची दहीहंड्या फोडत मिरवणूक


मुंबई  - दक्षिण मुंबईतील उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळाचे यंदाचे ७५ वे वर्ष आहे.या अमृत महोत्सवी वर्षांत गुरुवार ७ सप्टेंबर रोजी या मंडळाचे गोविंदा दरवर्षीप्रमाणे विविध वाद्ये,  ढोल ताशांच्या तालावर,भव्य चित्ररथ घेऊन दहीहंड्या फोडत पौराणिक मिरवणूक काढणार आहेत. 



उमरखाडीतून निघणारी ही मिरवणूक डोंगरी,जे.जे. हॉस्पिटल,गिरगाव, ठाकुरद्वारवरून पुढे चिंचबंदरला पोहचेल.या मिरवणुकीच्या नियोजनासाठी मंडळाचे  सदानंद आचरेकर,निवृत्ती फलके,प्रसाद भोसले, प्रफुल्ल मोरे,श्रीधर गोवेकर, नरेंद्र कांबळी,वसंत माळी, गणेश वारेकर,विद्याधर साळवी,शरद पाटील, पुरुषोत्तम पाटील आणि अभय चिंबुलकर आदी पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत.मंडळाची ही पौराणिक मिरवणूक पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असते.पाच मोठ्या ट्रकवर चित्ररथ उभारलेले देखावे हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य मानले जाते.या मिरवणुकीमध्ये सर्वधर्मीय नागरिक बहुसंख्येने सहभागी होऊन ही गोविंदा मिरवणुकीची शोभा वाढवित असतात.हे मंडळ वर्षभर  विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात मग्न असते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या