जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना जाहीर


जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना जाहीर

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान , कणकवली यांचा 2023 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वजराट  जिल्हा परिषद शाळा येथील उपशिक्षक श्री तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना जाहीर करत आहोत. श्री तेजस यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील मुलांना विक्रमी यश मिळवून देवून अध्यापनाचा नवीन पायंडा निर्माण केला आहे. सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम पाच हजार रुपये असे पुरस्कार स्वरूप आहे. सदर पुरस्कार 26 नोव्हेंबर 2023 या सदाशिव पवार गुरुजी यांच्या मातोश्री सरस्वती लक्ष्मण पवार यांच्या स्मृतिदिनी कणकवली इथे समारंभ पूर्वक प्रदान केला जाईल.

या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून याआधी आदर्श शिक्षक प्रफुल्ल जाधव आणि प्रतिभा कोतवाल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

धन्यवाद
शुभांगी पवार
सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान
कणकवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या