जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद-कोकण प्रांतच्या वतीने,अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन

 


जागतिक अहिराणी भाषा  संवर्धन परिषद-कोकण प्रांतच्या वतीने,अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन डोंबिवली प.येथील.,रेतीभवन बिल्डिंग,मिनी सभागृह ,आधार इंडिया येथे उत्साहात संपन्न झाले 


*कोकण प्रांतचे अध्यक्ष प्रा.मगन सुर्यवंशी सरांनी प्रास्ताविक करतांना अहिराणी भाषा खान्देश पासून भारतभर व भारतापासून जगभरात जवळजवळ ४०देशात पसरलेले २कोटी अहिराणी भाषिक घरांत अहिराणी बोलतात व एकमेकांना भेटतात तेव्हाही निःसंकोचपणे अहिराणी भाषा बोलतात म्हणून अहिराणी भाषेचे अस्तित्व आबाधित आहे व अहिराणी भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी परिषद  कटीबध्द आहे.तसेच अहिराणी भाषा सप्तभाषांनी समृध्द असून मराठी भाषेपेक्षा प्राचीन असून पांडवलेणी लेणी येथील शालिवाहन राजाच्या काळातील शिलालेखावर कोरलेल्या शिलालेखाचे उदाहरण देऊन सांगितले .


 कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी नगरसेवक -समाजसेवक श्री नंदू धूळे[मालवणकर]तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सम्राट केशव भोईर,शिक्षणतज्ञ महादेव ढोकळे ,समाजसेवक सुशील सावंत ,आधार इंडियाचे सीईओ  डाॕ.अमित दुखंडे, समाजसेविका वनिता पाटोळे,खान्देश मराठा पाटील विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मनोज पाटील,पदाधिकारी भगवान पाटील,डाॕ.साईनाथ साळुंखे उपस्थित होते .सर्वांनी अहिराणी दिनदर्शिकेचे तोंडभरुन कौतुक केले तसेच अहिराणी भाषेचा प्रचार प्रसारासाठी यथायोग्य मदत करण्याचे जाहिर केले अगदी रंगभूमीवर अहिराणी नाटक,एकांकीका तथा चित्रपट ,मालिका यांस प्रोत्साहन देण्यांस डाॕ,अमित दुखंडे व नंदू मालवणकरांनी सांगितले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण प्रांतचे उपाध्यक्ष संजय पाटील सर,मुंबई विभागाच्या प्रमुख श्रीमती सविता पाटील,डोंबिवली विभाग प्रमुख सौ.लता पाटील,आधार इंडियाचे स्टाफ मेंबर्स यांनी मदत केली. 



दिपप्रज्वलन ,छत्रपती शिवाजी महाराज व क्रांती ज्योती सावित्री देवी फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यांत आले व घरेघर संदेश ,सोनाना खान्देश,मनी बानी,मनी वानी अहिरानी,जय खान्देश जय अहिरानीच्या जयघोषांत अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन  झाले,उपस्थित सर्वांना प्रत्येकी दोन  अहिराणी दिनदर्शिका देण्यांत आल्या तसेच सविता पाटील,लता पाटील, मगन सुर्यवंशी तथा वनिता एळंगे यांनी समयोचित कविता सादर करुन प्रकाशन समारंभात काव्यशरंग भरले.कोकण प्रांतचे उपाध्यक्ष संजय पाटील सरांनी आभार मानले व जय खान्देश जय अहिराणी असा जयघोष करून सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची  सांगता करण्यात आली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या