मुंबईतील भीम सैनिकाचे आवाहन
मुंबई - अकोले शहरातील महात्मा फुले चौकालगत असलेल्या ३० गुंठे जागेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारले जाणार आहे.मात्र या जागेवर काही धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. तरी हे अतिक्रमण त्वरित हटविले जावे या मागणीसाठी अकोले स्मारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवार ५ जानेवारी अकोले येथे जनआक्रोश विराट मोर्चाचे आयोजन केले आहे, अशी माहिती या समितीचे सदस्य दिपकभाऊ किल्लेकर यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली दिली.
गेली ४० वर्षे या प्रस्तावित स्मारकासाठी न्यायालयीन लढा देऊन भीम सैनिकांनी तो जिंकून दाखविला आहे.मात्र या स्मारकाच्या जागेवर काहीनी अतिक्रमण केले आहे.हे अतिक्रमण त्वरित हटविले जावे या मागणीसाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अकोले तालुका आणि परिसरातील आंबेडकरप्रेमी जनतेने या मोर्चात सहभागी होण्यासाठी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर पोलीस ग्राऊंड येथे जमावे,असे आवाहनही दिपकभाऊ किल्लेकर यांनी केले आहे.


0 टिप्पण्या