दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त
विनम्र अभिवादन ! (६ जानेवारी २०२३)
पत्रकार म्हणजे.....
म नापासून समाज कार्य करणारे
रा गावर नियंत्रण ठेवणारे
ठी क नसणाऱ्या ठिकाणी जाणारे
असा असावा मराठी पत्रकार !! १ !!
प हिल्या पासून वाचनाची आवड असणारे
त्र स्त लोकांना न्याय देणारे
का रणाशिवाय प्रश्न न विचारणारे
र खडलेल्या प्रकल्पांना वाचा फोडणारे
असा असावा मराठी पत्रकार !! २ !!
दि वस रात्र बातम्या देणारे
न म्रता स्वभावात असणारे
असा असावा मराठी पत्रकार !! ३ !!
आपल्या भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ १९१वा मराठी पत्रकार दिनानिमित्त निर्भिडपणे जिवंत ठेवणाऱ्या माझ्या "पत्रकार मित्रांना" हार्दिक शुभेच्छाऽऽऽ !
तसेच आपल्या पत्रकार बंधुं आणि भगिनींना २०२३ हे वर्ष ना कोणत्याही 'संकटाविना' जावो, ही सदिच्छाऽऽऽ !!
~@ शब्दश्री विलास देवळेकर



0 टिप्पण्या