सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ठाणे द्वारा नगर राजभाषा कार्यान्वयन समिति, ठाणे ची सहामाही सभा संपन्न




सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय,  ठाणे द्वारा नगर राजभाषा कार्यान्वयन समिति, ठाणे ची चौदावी सहामाही सभेचे संयोजन  डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे शुक्रवार, दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले.  या सभेमध्ये मंचावर एनपीसीआईएलचे स्थल-निदेशक, श्री अनिल देशमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे, विभागीय प्रमुख, श्री सतीश अग्रवाल आणि प्रादेशिक प्रमुख व सभेचे अध्यक्ष, श्री सुंधाशु शेखर यांच्या सह प्रमुख पाहुण्या माननीया डॉ. सुस्मिता भट्टाचार्य, उप निदेशक, भारत सरकार,गृह मंत्रालय उपस्थित होत्या. 


सभेचा शुभारंभ परंपरेनुसार प्रमुख पाहुण्या माननीया डॉ. सुस्मिता भट्टाचार्य यांच्या शुभ हस्ते  दीप प्रज्ज्वलनाने झाला. त्यांनी आपल्या संबोधनात भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभागाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.  आणि आपआपल्या कार्यालयीन कामात   राजभाषा हिन्दी भाषेचा जास्तीतजास्त  प्रयोग करावा. हिन्दी पत्रव्यवहार वाढवावा, या मुद्द्यावर भर दिला.


 त्यानंतर प्रत्येक सदस्य कार्यालयच्या राजभाषा हिन्दी संबंधी प्रगतीचा आढावा घेतला.  

सभेत सदस्य-कार्यालयांनी आपआपल्या कार्याच्या प्रगतीची माहिती दृश्यश्रव्य स्वरुपात प्रस्तुत केली. सदस्य कार्यालयांच्या  हिन्दी राजभाषेच्या उत्कृष्ट कार्यान्वयन बद्दल मान्यवरांनी प्रशंसा केली. तसेच सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


या सभेमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय,  ठाणे कार्यालयात कार्यरत सहायक व्यवस्थापक -राजभाषा, सुश्री रेवती कृष्णा आळवे द्वारा तयार केलेल्या राजभाषा हिन्दी संबंधी एका पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.


या सभेत ठाण्यातील २९ विविध कार्यालयांचे सदस्य, राजभाषा अधिका-यांसोबत त्यांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे  सूत्र-संचालन भूतपूर्व मुख्य व्यवस्थापक-राजभाषा, श्री सुधीर पाठक यांनी केले. या सभेचे राष्ट्रगीताने समापन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या