अनिल पाटणकरांनी अखेर ' करून दाखवले "!
२ महिन्यात उभारला पालिकेचा दवाखाना
मुंबई- बेस्टचे माजी अध्यक्ष आणि चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १५३ चे कार्यसम्राट माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'करून दाखवले " या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवले आहे. चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर पालिका शाळेजवळ पाटणकर यांनी पालिकेच्या माध्यमातून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे भूमिपूजन करताना हा दवाखाना दोन महिन्यात बांधुन पूर्ण करून त्याचे लोकार्पण केले जाईल असे आश्वासन दिले होते.ते त्यांनी पूर्ण केले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने पालिकेच्या माध्यमातुन उभारलेल्या या दवाखान्याचा लोकार्पण सोहळा शासकीय प्रोटोकॉलनुसार नुकताच स्थानिक खासदार राहुल शेवाळे,स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर व स्थानिक माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी महिला उपविभाग संघटिका सुलभा पत्याने,शाखाप्रमुख उमेश करकेरा,महिला शाखा संघटीका योगिता म्हात्रे, समाजसेविका मिनाक्षी पाटणकर,माजी शाखा संघटीका वैशाली कदम, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड,युवासेना उपविभाग अधिकारी विनय साठले,शिवसेना - युवासेना महिला,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पाटणकर म्हणाले की,समाजहिताच्या कामामध्ये आम्ही कधीच राजकारण आणत नाही. त्यामुळे शासकीय प्रोटोकॉलनुसार हा लोकार्पण सोहळा पडला आहे.आम्ही सातत्याने पाठपुरावा करून लोकांच्यासाठीच पालिकेच्या माध्यमातून हा दवाखाना बांधला आहे.यात कुणी कितीही अप्रत्यक्ष राजकारण केले तरी त्यात त्यांना यश येणार नाही हे या लोकार्पण सोहळ्यातून दिसून आले आहे.


0 टिप्पण्या