अमर वीर जवानाच्या कुटुंबियांची मागणी



 ५ व्या स्मृती दिनानिमित्त तरी जन्मगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्मारक व्हावे यासाठी सरकारने दखल घ्यावी, अशी कुटूंबियांची आर्त हाक 


 कणकवली दि.२० डिसेंबर 


 आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठी अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. अनेक शूर वीर शहीदही झाले आहेत. त्यातीलच एक शूर वीर कणकवली तालुक्यातील नरडवे (भैरवगाव) गावचे रहिवासी अमर जवान सदाशिव गंगाराम बाईत हे आहेत. भारत -पाकिस्तान यांच्या मध्ये  १९७१ साली झालेल्या युद्धात शत्रूशी दोन हात करताना ते मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या हौतात्म्याला २१ डिसेंबर २०२१ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात आणि त्यांचे कार्य नव्या पिढीपुढे यावे यासाठी त्यांच्या जन्मगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे. किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणाला त्यांचे नाव शासनाने द्यावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे (भैरवगाव)चे सुपुत्र असलेले सदाशिव बाईत यांचा जन्म १ जून १९४० साली झाला होता. ते  आपल्या वयाच्या बाविसाव्या वर्षी म्हणजे ९ नोव्हेंबर १९६२ रोजी  देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाले.  मराठा लाईट इन्फंट्री ,बेळगाव येथून ते सैन्यात भरती झाले होते. देश सेवा करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सैन्य सेवा मेडल, पूर्वी स्टार मेडल, संग्राम मेडल देऊन गौरविण्यात आले होते.  भारत पाकिस्तान विरुद्ध १९७१ साली झालेल्या युद्धात शत्रूशी दोन हात करताना ते मृत्युमुखी पडले. त्यांच्या  हौतात्म्याला २१ डिसेंबर २०२१ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.  त्यांच्या शौर्याचा देशातर्फे मरणोत्तर बॅज ऑफ सॅक्रिफाइस  हे शौर्य पदक देऊन गौरव करण्यात आला आहे. अशा या महान वीर जवानाचे कार्य नवीन पिढीसमोर यावे आणि नवीन पिढीने देश सेवेसाठी पुढे यावे अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे. सदाशिव बाईत यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सून  व  नातवंडे , पुतणे व  इतर कुटुंबीय आहेत. त्यांचे सुपुत्र सुभाष बाईत हे कणकवली येथे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. सदाशिव बाईत यांच्या जन्मगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची व गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यांचे पुतणे सुरेश बाईत यांनी लोकसत्यवाणी न्युजचे संपादक संतोष सावंत यांच्याशी बोलताना ही माहिती दिली.

---------------------------*******************************--------------------------------

देशासाठी लढत असताना वीरमरण आलेल्या सदाशिव बाईत यांना  त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मरणोत्तर शौर्यगौरव पुरस्कार डोंबिवली येथे देण्यात येईल, व त्यांच्या धर्मपत्नी सुलोचना यांचा आदरातिथ्य सत्कार संतोष प्रकाशनचे सा. स्नेहसंयोग वृत्तपत्र...व लोकसत्यवाणी न्युज चॅनेलच्या वतीने 1 जानेवारी 2023 ला करण्यात येणार आहे.

---------------------------*******************************--------------------------------

भारत पाक युद्धात 21 डिसेंबर रोजी वीरमरण आलेल्या सदाशिव बाईत यांच्या हौतात्म्याला 51  वर्ष पूर्ण होत आहे, लोकसत्यवाणी न्युजच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या