सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ठाणे मध्ये ‘सेंट्रल बँकेचा ११२ वा स्थापना दिवस’ हर्षोल्लासात संपन्न





सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ठाणे येथे बुधवार, दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी बँकेचा  ११२वा स्थापना दिवस हर्षोल्लासात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रादेशिक प्रमुख,  श्री सुंधाशु शेखर यांनी बॅंकेचे संस्थापक सर सोराबजी पोचखानावाला जींच्या फोटोला श्रद्धासुमन अर्पण करुन, दीप प्रज्ज्वलाने झाला.    यावेळेस बॅंक-ग्राहकांना कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणे ग्राहक-सेवा करण्यासाठी उपस्थित सर्व कर्मचा-यांनी शपथ घेतली.  प्रादेशिक प्रमुख यांनी बॅंकेचा प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहाण्यासाठी  सर्व कर्मचा-यांनी सतत कार्यरत राहावे, यासाठी मार्गदर्शन केले.  




या दिवसाचे औचित्य साधुन ‘बजाज एलियांज जनरल इंश्योरेंस कंपनी लि.’ च्या  सौजन्याने  बॅंकेच्या सर्व ग्राहक/ कर्मचा-यांसाठी ‘हेल्थ कैम्प’ चे आयोजन केले.  सर्वांनी या ‘हेल्थ कैम्प’ चा लाभ घेतला.  तसेच कल्याण वाहतूक पोलिस स्टेशन साठी बैरिकेड सुपुर्द करण्यात आले.



या कार्यक्रमात आभार प्रदर्शन बॅंकेचे व्यवस्थापक श्री साईनाथ हामंद यांनी प्रस्तुत केले आणि  सूत्र-संचालन सहायक व्यवस्थापक-राजभाषा, सुश्री रेवती आळवे यांनी केले. या कार्यक्रमात सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या