पात्र लाभधारकांनी प्रहार कार्यालयात संपर्क साधण्याचे आप्पासाहेब ढूस यांचे आवाहन..
कै. भिमराज ढूस यांच्या ४१ व्या पुण्यतिथि निमित्ताने सामजिक उपक्रम..
देवळाली प्रवरा - दि. २१ डिसेंबर
डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना व तत्कालिन राहुरी कारखान्याचे मा. संचालक कै. भिमराज रामजी ढूस यांची आज ४१ वी पुण्यतिथी निमित्ताने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार श्रमिक सेवा संघाच्या वतीने देवळाली प्रवरा हद्दीमध्ये राहणाऱ्या आणि स्व मालिकेची जागा आणि घर नसलेल्या भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या गरजू नागरिकांकडून तसेच विधवा, विधुर, वयोवृद्ध, अनाथ आणि अपंग नागरिकांकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुला साठी अर्ज भरण्याचा शुभारंभ करण्यात आला..
प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, प्रहार श्रमिक सेवा संघाचे शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण, प्रहार कामगार सेलचे शहर अध्यक्ष किरण पंडित, प्रहार दिव्यांग सेलचे शहर अध्यक्ष सलीम शेख, संघटक सुनील कदम, गणेश भालेकर, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, प्रसाद ढूस आदी सह अनेक प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रहार श्रमिक सेवा संघ आणि प्रहार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे वडील व डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना तथा तत्कालीन राहुरी कारखान्याचे माजी संचालक व कित्येक निराधारांचे आधारवड ठरलेले भिमराज ढूस यांचे दि. २१/१२/१९८१ रोजी निधन झाले... वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत. परंतु, ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते त्या दिवशी जीवनात या जगातील चटक्यांची खऱ्या अर्थानं माणसाला जाणीव होते.. भिमभाऊंनी आम्हाला नोकरीला लावून दिले.. आम्हाला खूप खूप मदत केली असे गावात आणि पंचक्रोशीत बहुतेक नागरिकांच्या तोंडून आम्हाला आजही ऐकायला मिळते.. हेच लाखमोलाचे संस्कार भाऊ आम्हाला देवून गेले.., असे म्हणतात की, संस्काराची शिदोरी कधीही संपत नाही.. तोच संस्काराचा वसा घेवुन आम्हीं आमच्या जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहोत..
असे भिमराज ढूस यांना श्रद्धांजली अर्पण प्रसंगी बोलतांना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा हद्दीमधील भटक्या जाती आणि विमुक्त जमातीच्या नागरिकांसह विधवा, विदुर, वयोवृद्ध, अनाथ आणि अपंग नागरिकांना त्यांच्या मालकीची जागा आणि हक्काचे घर उपलब्ध करून देणे हीच खरी राहुरी कारखान्याच्या माध्यमातुन देवळाली प्रवराच नव्हे तर कारखाना पंचक्रोशीत सामाजिक कार्यात मोठे योगदान दिलेल्या कै. भिमराज रामजी ढूस यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे.
म्हणून आजपासून देवळाली प्रवरा येथील सोसायटी चौकात असलेल्या प्रहारच्या कार्यालयामध्ये देवळाली प्रवरा हद्दीतील ज्यांना स्वमालकीची जागा तसेच घर नाही अशा भटक्या जाती आणि विमुक्त जमाती प्रवर्गांमधील नागरिक तसेच विधवा विधुर वयोवृद्ध अनाथ आणि अपंग नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याचा प्रहार चा मानस असून त्या दृष्टीने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे सहकार्याने देवळाली प्रवरा मधील गरीब नागरिकांना स्व मालकीचे घर देण्यासाठी देवळाली प्रवरा सोसायटी चौकामध्ये असलेल्या प्रहार च्या कार्यालयामध्ये भिमराज ढूस यांच्या ४१ व्या पुण्यति निमित्ताने अर्ज भरून घेण्याची सुरुवात करत असून देवळाली प्रवरा हद्दीमधील गरजू नागरिकांनी प्रहारच्या कार्यालयात सकाळीं 10 ते सायं 05 पर्यंत संपर्क करून विहित नमुन्यात अर्ज भरुन द्यावा व स्वतःची नाव नोंदणी करावी असे आवाहन याप्रसंगी आपासाहेब ढूस यांनी केले आहे.



0 टिप्पण्या