महाविकास आघाडी पक्षाचे १२ ते १३ आमदार संपर्कात असल्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला बॉम्ब..



प्रतिनिधी: अवधुत सावंत


  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवली. तर, महाविकास आघाडीचे आणखी १२ ते १३ जण शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला, असा बॉम्ब उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली. यावेळी त्यांनी हा धक्कादायक दावाही केला.


  मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, याउलट महाविकास आघाडीचे आणखी १२ ते १३ जण शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. भाजप आणि शिंदे यांच्याकडे १७० चा आकडा असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. महाविकास आघाडीत काय समाविष्ट होणार, हे आज उघडकीस आले आहे. सध्या लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्यावर मी खोके घेतले होते का ? असा थेट प्रतिप्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या