डोंबिवलीतील व्यावसायिक तसेच मुंबईतील प्रसिद्ध खर्डीकर क्लासेसचे संचालक डॉ.सुनील खर्डीकर यांना लोकमत ठाणे गौरव २०२२ यांना वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्तेपुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ठाण्यात झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरजी मुनगंटीवार, लोकसभेचे कल्याणचे खासदार श्रीकांतजी शिंदे,विधानसभा आमदार प्रतापजी सरनाईक, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे,ठाणे जिल्हाधिकारी अशोक शीनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर,जिल्हा परिषद ताणें मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल,ठाणे शहर पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अभिनेत्री सुप्रिया पाठारे, अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेता अंशुमन विचारे अशा राजकीय व सिने क्षेत्रातील दिगगजांच्या उपस्थितीत डॉ. सुनिल खर्डीकर यांना लोकमत ठाणे गौरव २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ सुनील खर्डीकर यांनी आजवर शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले असून बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या मार्फत देशाचे भवितव्य बनवण्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. त्याचबरोबर व्यावसायिक क्षेत्रातही ते पुढे सरसावत असून त्याच्याच जोडीला विविध प्रकारचे सामाजिक कार्य करण्यात खर्डीकर यांचा पुढाकार दिसत आहे. होतकरू विद्यार्थी व गरजूंना मदत करत सर्वोतोपरी सामाजिक कामगिरी बजावण्याच्या भूमिकेमुळे डॉ सुनील खर्डीकर यांना लोकमत ठाणे गौरव २०२२ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या