केंद्र सरकारने " हर घर तिरंगा" प्रमाणे " हर घर संविधान "अभियान राबविणे काळाची गरज. - कामगार नेते व गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे

 केंद्र सरकारने  " हर घर तिरंगा" प्रमाणे " हर घर संविधान "अभियान राबविणे काळाची गरज. कामगार नेते व  गुणवंत कामगार प्रभाकर  कांबळे .



मुंबई ( प्रतिनिधी) भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्या मुळे आजादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्र सरकारने सुरू केलेल्या "हर घर तिरंगा " प्रमाणे "हर घर भारत का संविधान" देणे काळाची गरज असल्याचे  राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष व कामगार नेते प्रभाकर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे.

         देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी "हर घर तिरंगा प्रमाणे "केंद्र सरकारने देशभर " हर घर संविधान "अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेऊन संविधानाच्या प्रास्ताविकतेतील माहिती देशातीैल  प्रत्येक नागरिकांच्या मनावर कोरली पाहिजे. त्यासाठी विविध सामाजिक संघटनाकडून" हर घर संविधान " अभियान चळवळ  न राबवता  केंद्र व राज्य सरकारने " हर घर संविधान "        अभियान चळवळ 15 ऑगस्ट नंतर   26 नोव्हेंबर पर्यंत संविधान दिनाचे औचित्य साधून सुरू ठेवले पाहिजेत . आज देशातील बहुतांश नागरिकांना भारताचे संविधान काय आहे त्याबद्दल नीट माहिती दिली जात नाही ती देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने करणे काळाची गरज असल्याचे प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले...

           केंद्र सरकारने "हर घर तिरंगा "वाटप कार्यक्रमाचे नियोजन प्रत्येक शासकीय कार्यालयात ठेवून आपला हेतू साध्य करण्यासाठी तिरंग्याचा वापर करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा समाजकंटकापासून वाचविण्यासाठी" हर घर संविधान"  अभियानाची चळवळ राबवून देशातील प्रत्येक व्यक्तीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात कोण कोणत्या प्रकारची माहिती आहे याची जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजेत त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने "हर घर तिरंग्या "प्रमाणे " हर घर संविधान" मोफत देण्याची व्यवस्था करावी अशी ही मागणी कामगार नेते प्रभाकर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या