डोंबिवलीतील सम्राट चौकात कोरोनाच्या दिर्घकाळानंतर 'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' तर्फे २०२२ च्या भव्यदिव्य दहीकाला उत्सवात कर्णबधिर मुलांना दहीहंडी फोडण्याच्या प्रथम मान..

 डोंबिवलीतील सम्राट चौकात कोरोनाच्या दिर्घकाळानंतर 'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' तर्फे २०२२ च्या भव्यदिव्य दहीकाला उत्सवा


त कर्णबधिर मुलांना दहीहंडी फोडण्याच्या प्रथम मान..


प्रतिनिधी: अवधुत सावंत


  डोंबिवली पश्चिम येथील पंडित दीनदयाळ रोड वरील सम्राट चौकात यंदा दोन वर्षानंतर दिनांक १९.०८.२०२२ रोजी होत असलेल्या दहीकाला उत्सवात यंदा माजी नगरसेवक व युवा नेता 'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' यांच्यातर्फे "स्वराज्य दहीहंडी महोत्सव २०२२" मध्ये यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणून दहीहंडी फोडण्याचा प्रथम मान कर्णबधिर मुलांना मिळणार आहे. कोरोना काळात सर्वत्र निर्बंध घालण्यात आल्यामुळे सर्वच उत्सव बंद पडले होते ते निर्बंध आता शिथिल करण्यात आल्यामुळे यंदा गोविंदा पथकांसाठी राज्य शासनाने दहा लाखांचा विमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर गोविंदा पथकांमध्ये आनंदाचे वातावरण असून राज्यात सगळीकडे 'जन्माष्टमी व दहीकाला उत्सव' जोमात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे असे चित्र आहे. 


  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील या उत्सवासाठी डोंबिवलीत उपस्थित राहणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या उत्सवाला 'सोनी' मराठी वाहिनीवरील "महाराष्ट्राची हास्यजत्रा" या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतील कलाकार गौरव मोरे व शिवली परब हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.


विशेष म्हणजे 'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' यांच्यातर्फे यंदा भव्यदिव्य अश्या तीन दहीहंड्या ठेवल्या असून एक डोंबिवलीच्या नागरिकांसाठी व मंडळांसाठी, दुसरी मुंबईच्या मंडळांसाठी व तिसरी महिला पथकांसाठी विशेष दहीहंडी असणार आहे. आतापर्यंत डोंबिवली-कल्याण मधील ३५ गोविंदा पथकाने आपले नाव नोंदीवले आहे तसेच ठाणे, मुंबई व आसपासच्या शहरातून मिळून एकूण १०० पथकं अपेक्षित  असल्याचे सांगण्यात आले.

 

  कोरोना काळातील गेल्या दोन वर्षात नागरिकांना कोणत्याही उत्सवात भाग घेता आला नव्हता म्हणून 'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' ने हा उपक्रम राबविण्याचा मानस केल्याचे तसेच कर्णबधिर मुलांना वेगळेपणा वाटू नये याकरिता 'संवाद' कर्णबधिर शाळेच्या अध्यक्षा व संचालिका श्रीमती. अपर्णा आगाशे यांच्याशी बोलून त्यांनी कर्णबधिर मुलांना पहिली हंडी फोडण्याचा मान देत असल्याने डोंबिलीतील पहिली भव्यदिव्य दहीहंडी फोडण्याचा सम्मान कर्णबधिर मुलांचा असणार आहे असा हा आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न असून सामाजिक संदेश देत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 


  या उत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना पश्चिमेकडील सम्राट चौकाच्या पुढे जाण्या-येण्यासाठी गैरसोय होऊ नये याकरिता वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याशी नियोजन करून सम्राट चौका पर्यंत येणारे रस्ते वाहतुकीसाठी एकदिशा करण्यात आले आहेत व वाहतुकीचे अधिक योग्य नियोजन करण्यासाठी व पोलीस यंत्रणेवर कुठेही ताण पडू नये म्हणून 'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' तर्फे ३० वॉर्डन नेमण्यात आल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.


  विशेषतः हा जन्माष्टमी व दहीकाला २०२२ उत्सव साजरा करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  'सेफ्टी चे सगळे प्रीकॉशन' घेत लहान मुलं जी वरच्या थरांवर चढतात त्यांना 'सेफ्टी हार्णेस' देखील लावत असून सर्व नियमांचे पालन करून हा दहीकाला उत्सव हा मोठा हिंदू सण साजरा करत असल्याचे माजी नगरसेवक व युवानेते दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतील उपस्थित पत्रकारांना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या