कल्याणमध्ये भगव्यामय वातावरणात निघाली तिरंगा रॅली..

 कल्याणमध्ये भगव्यामय वातावरणात निघाली तिरंगा रॅली.. 



 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  ‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कल्याण पश्चिम येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती नवनीतानंद  महाराज (मोडक महाराज) यांच्या सूचनेनुसार १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सकाळी ११ वाजता फॉरेस्ट कॉलनी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत गुरुबंधू व गुरुभगिनी भगवेवस्त्र परिधान करून पायी यात्रा काढण्यात आली. यावेळी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती, सर्वांच्या हातात तिरंगा ध्वज व देश भक्तीपर घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली.

  फॉरेस्ट कॉलनीतील मठापासून सुरू झालेली पदयात्रा मुरबाड रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून काळा तलाव, बेतूरकर पाडा, खडकपाडा मार्गे पुन्हा मठात येऊन महाभंडारा घेऊन या पदयात्रेची सांगता झाली, यावेळी गुरुवर्य नावनीतानंद महाराज मोडक महाराज यांच्या सह माजी आमदार नरेंद्र पवार, माजी परिवहन सदस्य बाळा परब, अशोक गायकवाड यांच्यासह शेकडो स्वामी भक्त उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या