जीवनदायी दायी भवन वरळी येथे रूग्ण मित्रांची संस्था भेट

 जीवनदायी दायी भवन वरळी येथे रूग्ण मित्रांची संस्था भेट



मुंबई- रूग्ण मित्र विनोद साडविलकर व धनंजय पवार यांच्या संकल्पनेतून ४था संस्था भेट उपक्रम प्रसन्न फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष श्रध्दा अष्टीवकर यांनी आयोजित केला होता.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे सीईओ व रूग्ण मित्रांचे प्रेरणास्थान डाॅ.सुधाकर शिंदे यांनी MPJAY व PMJAY या योजनेची माहिती व रूग्ण मित्रांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.तसेच गरजूंपर्यंत योजनांचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन सीईओ डाॅ.सुधाकर शिंदे यांनी रूग्ण मित्रांना केले.                    २४×७ कार्यरत काॅल सेंटर व प्रशासकीय कार्यालयाला भेट देण्यात आली.

प्रसन्न फाउंडेशनच्या कार्य अहवालाचे प्रकाशन सीईओ डाॅ.सुधाकर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

१२ मे २०२२ रोजी झालेल्या आरोग्य विषयक राज्य स्तरीय बैठकीतील विविध वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांचे वनपेज छायाचित्र रूग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी सीईओंना दिले. 

संस्था प्रमुख राजेंद्र ढगे,किरण गिरकर,पंकज नाईक,चारूदत्त पावसकर,संतोष वेंगुर्लेकर,नितीन शिंदे,सुभाषराव गायकवाड,नवीनकुमार पांचाळ,दिनेश बैरीशेट्टी,प्रसाद मांडवकर,संजय पाटील,गणेश सोनावणे,जयकिसन डुलगच,अजित वहाडणे,सुधीर सोनावणे,परेश मोरे,सुशांत मेस्ता,महेश दराडे,डाॅ.संजय वैष्णव,रोहन पालकर,पिंकी पाटील,माधवी जगदनकर,    संध्या भंडारे,डाॅ.अलका थरवळ,नयना साळवी इ.मान्यवरांनी सहभाग नोंदविला.रूग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या