संस्थेने पहिला टप्पा हा विश्रामगड(पट्टाकिल्ला) या ठिकाणी वृक्षारोपण करून पूर्ण केले व दुसरा टप्पा हा १५ ऑगस्ट २०२२ म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सर्जूनाथ विद्यालय सावरगाव पाट या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना वृक्षवाटप करून पूर्ण केला.
या प्रसंगी स्वामी सेवा संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ नेहे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, आज संपूर्ण विश्व हे ग्लोबल वॉर्मिग सारख्या संकटाशी झुंज देत आहे आणि हिच गोष्ट लक्षात घेऊन आपण निसर्गाचं काही देणं लागतो ही देण्याची वृत्ती आपल्या अंगी रुजवावी त्यासाठी आपण झाडे लावू व त्यांचे संगोपन करू.. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला !!
यावेळी सर्जुनाथ विद्यालय सावरगाव पाट चे मुख्यध्यापक आदरणीय तुकाराम कानवडे सर, पंडित नेहे सर, शिकारे सर,वावळे सर, पोपट पवार सर, विठ्ठल पथवे, प्रविण सहाणे, बाजीराव वाकचौरे,शरद सहाणे,नितीन नेहे,संपत जगताप उपस्थीत होते.
0 टिप्पण्या