विक्रोळी कांजूरमार्ग एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची ' हर घर तिरंगा 'ची मोहिम जल्लोषात साजरी.
मुंबई दि.(प्रतिनिधी) महिला व बालविकास विभाग अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनातील विक्रोळी कांजूरमार्ग बाल विकास प्रकल्पाद्वारे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून "हर घर तिरंगा "मोहीम बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. हेमा काटकर व सेक्टर 'अ' च्या पर्यवेक्षिका नंदिता काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पाककलेच्या माध्यमातून 'तिरगा आहार, तसेच सी बी कार्यक्रम व मुलांच्या चित्रकला स्पर्धा 'देश भक्तीपर गाण्याच्या माध्यमातून टागोर नगर ग्रुप नं ८ येथील तक्षशील बुद्ध विहारात प्रकल्प अधिकारी सौ हेमा काटकर यांच्या अध्यक्षतेखाली हर घर तिरंगा मोहिमेला जल्लोषात सुरुवात करण्यात आली.
आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पाककलाच्या माध्यमातून कडधान्य व पालेभाज्या यापासून बनविलेला तिरंगा आहार व देशभक्तीच्या गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे आयसीडीएस सेक्टर 'अ' च्या पर्यवेक्षिका नंदिता काळभोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा 'अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका पल्लवी सावळ यांनी केले असून कार्यक्रमाची सुरुवात प्रकल्प अधिकारी सौ.हेमा काटकर. शिवसेना महिला संघटक सौ.प्रिया गावडे, मधुरा महिला मंडळाचे अध्यक्ष मधुरा जोशी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार व गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करण्यात आली असून पाककल्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कडधान्य व पालेभाज्या द्वारे तिरंगा रंगांच्या वापर करून ' तिरंगा आहाराची जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर 'हर घर तिरंगा ' घर घर तिरंगा लावण्यासाठी प्रभात फेरी द्वारे प्रत्येक विभागातील अंगणवाडी सेविका यांनी मुले मुली यांना केंद्र सरकारने आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या मोहिमेत विविध प्रकाराच्या माध्यमाद्वारे
जनजागृती करण्यात येत असल्याचे अंगणवाडी कर्मचारी यांनी सांगितले. कार्यक्रमाला अंगणवाडीतील मुले मुली किशोरवयीन मुली पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार पल्लवी मॅडम यांनी मानले असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
0 टिप्पण्या