चेंबूरच्या एमएस पाटील वाडीत भरपावसात घराची भिंत कोसळली



 * सुदैवाने कुटुंब बचावले * पाटणकरांची तत्काळ मदत 


मुंबई- चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील एमएस पाटील वाडीतील नवनाथ सोसायटी आणि माऊली मित्र मंडळ येथे राहणार्‍या लक्ष्मण निकम यांच्या घराच्या पोटमाळ्यावरील घराची भिंत काल मध्यरात्री भरपावसात अचानक कोसळल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी हानी झाली नाही.


येथील लक्ष्मण निकम यांच्या  घराचे बांधकाम जुने असून  ते भिंतींच्या रूपाने काल कोसळले.यात घरातील कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.या दुर्घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक आणि बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांना कळताच त्यांच्या सूचनेनुसार तत्काळ शाखाप्रमुख उमेश करकेरा  यांनी आपल्या  कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पोलीस ठाणे,

अग्नीशमन दल,अदानी इलेक्ट्रिक आणि पालिका अधिकार्‍यांना कळवून मदतकार्य सुरू केले. यावेळी त्यांच्यासोबत उपशाखा प्रमुख विश्वनाथ पवार, गटप्रमुख बाळू नानेकर,

युवासेना उपशाखा अधिकारी विनय साटले,युवा सेना महिला शाखाधिकारी कविता यादव आणि माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या