प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण तालुक्यातील चिकणघर येथे असणाऱ्या 'मोरया स्वीट्स ऍण्ड ड्रायफ्रुट' च्या दुकानाचे शटर फोडून दुकानातील ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या तिघांना महात्मा फुले पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान या संशयीत आरोपींकडून ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.
मोहम्मद करीम उर्फ लाडो अख्तर अली बागवान (रा. खेमाणी उल्हासनगर), साकीर जाकीर खान (वय २०, रा. म्हारळगाव), शिवम महेंद्र बतमा उर्फ 'मच्छी' (वय २०, रा. जावसईगाव, अंबरनाथ पश्चिम) अशी सराईत आरोपींची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चिकणघर येथे 'मोरया स्वीट्स ऍण्ड ड्रायफ्रुट' चे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी दि.१७ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चोरी करून रुपये ३२ हजार २०० चा मुद्देमाल लंपास करण्यास आला. त्यानंतर या घटनेची तक्रार दुकान मालकाने महात्मा फुले पोलीस ठण्यात नोंदवली. यानंतर सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीसांनी तीन संशयीत आरोपींना शिताफीने शोधून काढत गजाआड केले आहे.
0 टिप्पण्या