ठाणे --- वक्रतुड साहित्य मंच, ठाणेतर्फे १५ऑगष्ट२०२२,स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, स्वरचीत," राष्ट्रीय गीत गायन,आणि स्वातंत्र्य मनोगत "व्हिडिओ ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हृया ऊपक्रांत राष्ट्रीय गीत गायन आणि स्वातंत्र्य मनोगत व्हिडिओ,सादरीकरणासाठी, मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सहभागी मान्यवरांत, सुनंदा अमृतकर शुभांगी गादेगांवकर,वयोवृद्ध जेष्ठ नागरिक महादेव काठोळे,प्रिया गुजर, मनिषा जोशी, प्रितीजी काकडे आणि सोनाली सुतार ह्यांच्या ऊत्क्रुष्ठ व्हिडियो सादरीकरणासाठी,वक्रतुड ठाणेतर्फे,छान,सन्मानपत्र देण्यात आले.ऊपक्रम कार्याध्यक्षा, प्रितीजी काकडे, आणि उपक्रम समितीने आयोजित केलेल्या, उपक्रमाबद्दल "वक्रतुड मंच"अध्यक्ष जगन्नाथ खराटे ह्यांनी कौतुक केले.. तसेच ऊपक्रमांत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानुन त्यांच्या भावी वाट चालीसाठी अनेक शुभेच्छा व्यक्त केल्या, तसेच ह्या पुढे, वक्रतुंड मंचातर्फे होणार्या, विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले..
जगन्नाथ खराटे- ठाणे
0 टिप्पण्या