ठाणे---११ऑगष्ट-रक्षांबधनाच्या निमित्ताने साहित्यिक बांधवांचे" रक्षाबंधन फोटो उपक्रमांतर्गत," एक राखी साहित्यिक बांधवांसाठी हा ऑनलाईन रक्षाबंधन उपक्रम वक्रतुड साहित्य मंच, ठाणेतर्फे नुकताच पार पडला.वक्रतुड साहित्य मंच, ठाणे तर्फे गेल्या पांच वर्षापासुन विविध समाजसेवी ऑनलाईन ऊपक्रम राबविण्यात येतात, समाजात जनप्रबोधनपर साहित्याचे आदान प्रदान करुन,साहित्यसेवेद्वारे जन जागृती करण्यासाठी अविरत झटंत असतात,अशा ह्या साहित्यिक बांधवांच्या समाजसेवी कार्याचा गौरव व्हावा ह्या उद्देशाने हा ऑनलाईन कार्यक्रम करण्यात आला होता. ह्या उपक्रमांसाठी साहित्यिक बांधवांनी आपले रक्षाबंधनाचे फोटो पाठवुन भरभरून प्रतिसाद दिला होता. वक्रतुंड साहित्य, मंचातर्फे ऊपक्रमांत सहभागी मान्यवरांना ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.. वक्रतुंड साहित्य, मंचच्या, कार्याध्यक्षा-प्रितीजी काकडे आणि मंच कार्यकारिणी मान्यवर, सोनाली सुतार,सौरभ क्षिरसागर, मनिषा जोशी, श्रद्धाजी शेट्ये,अविनाश पवार ह्यांच्या सहभागातून हा ऊपक्रम यशस्वी झाल्याबद्दल, अध्यक्ष-जगन्नाथ खराटे हृयांनी सर्वांचे आभार मानले.तसेच, सहभागी साहित्यिक मान्यवरांना शुभेच्छा देवून वक्रतुंड साहित्य मंचच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे मंचातर्फे आवाहन करण्यात आले..
...जगन्नाथ खराटे, ठाणे



0 टिप्पण्या