संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाङमय मंडळ हे मुंबई विद्यापीठातील सर्वात जुने कार्यरत मंडळ आहे. मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्राचीन इतिहास त्याचबरोबर त्याचे महत्त्व आजकालच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळ कायमच कटिबद्ध असते!
ह्या वर्षी मंडळ शतकपूर्तीकडे वाटचाल करत आहे. सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी ' उद्घाटन सोहळा ' १५ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाचे नाव आहे, युगांतर - काळ, आज आणि उद्या
जो एखाद्या नदीप्रमाणे वाहत राहतो, कधी जलद तर कधी शिथिल, जो अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे, जो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो तो म्हणजे काळ! ह्या वर्षीच्या उद्घाटन सोहळ्याची थीम ' काळ ' आहे.
सुरील गाण्यांची मैफिल व सुंदर नृत्याविष्कारांनी परिपूर्ण असा हा कार्यक्रम असणार आहे. तब्बल २ वर्षांनी एक रोमांचक नाट्यकृती, टिंबकटु सादर केली जाणार आहे.
TDDP (the dharavi dream project) ह्या प्रसिद्ध डान्स ग्रुपच्या विद्यमाने अनेकानेक कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. तुमच्या मनोरंजनासाठी विविध कलाकृतींचे सादरीकरण त्यांच्याद्वारे केले जाणार आहे.
२०२२ च्या उद्घाटन सोहळ्याचा लाभ आपण सर्व सुद्धा घेऊ शकता! सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे. त्वरा करा, स्वतःला व तुमच्या मित्रमंडळाला रजिस्टर करून घ्या. रजिस्ट्रेशन लवकरच चालू होत आहेत.
सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मराठी रंगभूमीमधील प्रसिद्ध कलावंत उपस्थित राहणार आहेत! तर आपण ही संधी सोडू नका!!


0 टिप्पण्या