कल्याण मध्ये शिवसेनाप्रमुखावर प्राणघात खाल्ला



माजी नगरसेवकाने हल्ला केल्याच्या आरोप ,मात्र नगरसेवकाकडून आरोपाचे खंडन


कल्याण ( शंकर जाधव ) 

कल्याण मध्ये उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या उपशहर प्रमुख हर्षवर्धन पलांडे  यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या दरम्यान घडली . या हल्ल्यामागे शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा हल्लामागे हात असल्याचा आरोप पलांडे यांनी केला. मात्र या घटनेची माझ्या काडीमात्र संबंध नाही पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा असे सांगत  माजी नगरसेवक गायकवाड यांनी आरोपाचे खंडन केले .या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.



कल्याण पूर्वेतील संतोषी माता रोडवर ही घटना घडली आहे .बुधवारी सकाळी उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे काही कामानिमित्त आपल्या गाडीने जात असताना तीन ते चार अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.  पालांडे यांच्या आरोप आहे की, हल्लेखोर यांच्या हातात लोखंडी रॉड आणि तलवार या धारदार शस्त्र होते.शिवसेनेत तू जास्त उडतोय असे सांगत हल्लेखोराने पलांडे यांच्यावर हल्ला चढविल्याचे पलांडे यांनी केला आहे.

      या हल्ल्यात पालांडे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. कल्याणच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात कल्याण आणि उल्हासनगर मधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये जमा झाले, पालांडे यांच्या आरोप आहे की या हल्ल्यामागे शिवसेनेच्या माजी नगरसेवक महेश गायकवाड हे आहेत त्यांचा लोकांनी माझ्यावर हल्ला केला आहे .पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. याबाबत माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे म्हणणे आहे की ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेची माझ्या काही संबंध नाही.पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि जो कोणी माझा नाव घेत आहे या संदर्भात मी कोर्टात दावा दाखल करणार आहे. पालांडे यांचा आरोपाचा गायकवाड यांनी खंडन केले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा  तपास कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या