सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ठाणे चा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

 सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, ठाणे चा  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा









सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय ठाणे द्वारा दिनांक १९/०७/२०२२ रोजी मुरबाड मधील प्रतिष्ठित न्यू

इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मुरबाड येथे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवच्या अंतर्गत 

‘ज्ञान गंगा प्रश्न मंच’ चे आयोजन केले गेले. या कार्यक्रमामध्ये शाळेच्या ६३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमाचा

मुख्य उद्देश्य विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि भारतीय संस्कृती रुजावी, हाच आहे. या प्रश्नमंजुषेमध्ये ६३

विद्यार्थी सहभागी झाले.


    या शुभवेळी बॅंकेचे प्रादेशिक कार्यालय, ठाणे चे मुख्य व्यवस्थापक श्री जय कुमार सिंह, सहायक व्यवस्थापक-

राजभाषा सुश्री रेवती आळवे,  न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मुरबाड चे प्रचार्य श्री राकेश पाडवी आणि

उप प्राचार्य श्री शांताराम निकम, यांची मुख्य उपस्थिति होती.


कार्यक्रमाचे संचालन मुरबाड शाखेचे शाखा व्यवस्थापक, श्री आकाश कोतमिरे आणि आभार प्रदर्शन श्री सुधीर

झुंजारराव, स्टाफ यांनी प्रस्तुत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या