सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये वनमोहोत्सव व वृक्षदिंडी सोहळा संपन्न



 पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित, सरळगांव विभाग हायस्कूल व  कनिष्ठ महाविद्यालय सरळगांव ता.मुरबाड जि.ठाणे या विद्यालयात  दिनांक 20 जुलै20 22 रोजी वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 सदर वृक्षदिंडी व वनमोहोत्सव सोहळ्यासाठी मा. सौ रेखाताई कंटे जिल्हा परिषद सदस्या  ठाणे तसेच आदरणीय श्री. सदुभाऊ घुडे शालेय समिती सदस्य, माननीय श्री. पद्माकर (आप्पा) झुंजारराव शालेय समिती सदस्य, माननीय श्री. काशिनाथ गोविंद झुंजारराव (आबा  )शालेय समिती सदस्य, माननीयश्री. कांतीलाल कंटे साहेब  सामाजिक कार्यकर्ते,मा.  सौ. सुवर्णाताई ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या,  श्री.अफजल भाई शेख  सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्री. एकनाथ व्यापारी सामाजिक कार्यकर्ते माननीय रमेश हरड उपाध्यक्ष  शिक्षक पालक संघ इत्यादी मान्यवर हजर होते माननीय श्री. ना. तु .घुडे (बाबा) चेअरमन शालेय समिती यांचे शुभ आशीर्वाद कार्यक्रमास लाभले

 सर्व मान्यवरांचे विद्यालयाचे प्राचार्य माननीय जी. ओ. माळी सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले मान्यवरांनी आपल्या मनोगतातून माननीय प्राचार्य व शाळेतील सर्व कर्मयोगी यांचे वृक्षदिंडी सोहळा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले तसेच शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन त्यांचेही कौतुक केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय योगेश देसले सरांनी केले तर प्राध्यापकश्री. नंदकुमार  वाघचौरे यांनी वृक्ष संवर्धन प्रतिज्ञाचे वाचन केले सदर विद्यालयाचे पर्यवेक्षक  पंडित सर यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी कार्यक्रम प्रमुख श्री. एस. बी. पाटील सर  ,श्री.इधे एस.ए.सर व श्री खताळ एस. एस.,श्री.पाटील के.पी.,श्री.बागुल एस.एस. सर, सुरवसे सर,सागर पाटील सर, बोरसे सर, वानखेडे सर, पगार सर, सौ  इधे मॅडम, दळवी मॅडम, पिंजारी मॅडम, मोहपे मॅडम, अभिवंत मॅडम व वसतिगृहाचे व्यवस्थापक श्री.झुंजारराव सर ,श्री.अभिवंत , संजू बागुल तात्या यांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मयोगी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

 (मुरबाड प्रतिनिधी संजय इधे सर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या