कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण शीळ रस्त्याच्या लगत असलेल्या द्वारली गावानजीक उभारण्यात आलेल्या इमारतीमुळे नैसर्गिक नाल्याचे प्रवाह खुंटले आहे. त्यामुळे अर्धा तास जरी पाऊस पडला तर द्वारली गावातील नागरीकांच्या घरात पाणी शिरते. घरात पाणी शिरल्यावर नागरीकांना बाहेरचा आसरा घ्यावा लागतो. या गावातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी घाव घेऊन ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी प्रभाग अधिकारीही उपस्थित होते. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.


0 टिप्पण्या