अकोले / प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्रयाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील पट्टावाडी येथील पट्टाकिल्ला किंवा विश्रामगड परिसरात स्वामी सेवा संस्थेने आज वृक्षारोपण केले आहे. यामुळे गड परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. स्वामी सेवा संस्थेने १ लाख वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराज यांनी वास्तव्य केलेल्या पट्टाकिल्ला किंवा विश्रामगड परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे गडाच्या सौंदर्यात भर पडणार असून वृक्ष संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. या मोहिमेत मार्गदर्शक परशुराम नेहे, प्रमोद नेहे, प्रदीप नेहे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष अक्षय नेहे, सचिव अमोल नेहे, संपर्कप्रमुख अमोल आंबरे, संघटक सचिन एखंडे, शालीग्राम नेहे, शरद झालटे, संदीप पवार, दत्ता जाधव, दत्ता सहाणे, अक्षय नेहे, प्रतीक सहाणे, स्वप्नील जगताप, ऋषीकेश नेहे, योगेश सहाणे, प्रदीप बोऱ्हाडे, प्रवीण बोऱ्हाडे, विशाल सहाणे, तेजस झालटे सहभागी झाले होते.


.jpeg)
0 टिप्पण्या