कवी देवळेकर यांना पी. सावळाराम राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित !!



दि:- २४ जुलै २०२२ रोजी सकाळपासून डोंबिवली येथे "अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद - मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा विभाग" आयोजित "२रे पी. सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलनात" महाराष्ट्रातील 'साहित्यिक व कवी' उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यात, संमेलन उद्घाटक श्री शरद मधुकर गोरे, संमेलनाध्यक्षा- अध्यक्षा मुंबई प्रदेश हिरकणी राजश्री बोहरा, स्वागताध्यक्षा- अध्यक्षा ठाणे जिल्हा सौ. अनिता नरेंद्र गुजर यांच्या हस्ते कवी श्री संदीप पाटोळे लिखित "निसिंधु काव्यसंग्रहाचे" प्रकाशन झाले.  साहित्य पुरस्कार सोहळ्यात, उपस्थित रचनाकाराच्या साहित्याची दखल घेत, आणि ओळख व माहिती सांगत, प्रत्येक कवींना "सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह" देऊन गौरविण्यात आले. त्या नंतर, दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या सत्रात कवी संमेलनात, ज्यांनी एक कविता सादर केली आहे, त्यांनाही सहभागी "सन्मानपत्र व छोटीशी  स्मृतीचिन्ह आणि निसिंधु काव्यसंग्रह"  देण्यात आले. 

       मान्यवरांच्या हस्ते कवी श्री विलास देवळेकर यांचा "पी. सावळाराम राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार-२०२२" देऊन सत्कार करण्यात आले. तसेच, त्यांनी एक कविता सादर केल्या बद्दल, "सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह आणि निसिंधु काव्यसंग्रह" देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात उत्तम नियोजन करण्यात आले होते. आणि हा कार्यक्रम पावसातही थाटामाटात साजरा झाला, हे विशेष आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या