अंन्को कमाल पण शन्को मालामाल
(१५ एप्रिल २०२२)एप्रिलमध्ये शेवटच्या आठवड्यापासून तर मेच्या पूर्ण महिन्यात कोकणात मुबलक फळे वेगवेगळी खायला मिळतात. काजू, फणस, रतांबे, करवंद, तोरणे,आंबे अशी अनेक फळे आहेत, ती या मोसमातच मिळतात.
अंक्या - शंक्याची गजाल
अंन्को नि शंको हे दोघेही मित्र, अंन्को शंक्या पेक्षा दोन वर्षाने लहान.
एकदा काय झाला एका मोठ्या झाडावर भरपूर आंबे लागले होते झाडाचा घेर मोठं असल्याने चढताना अवघड व्हायचे, म्हणून कुणी त्या झाडावर चढायचा प्रयत्न करत नव्हते.त्या झाडाला आंबे भरपूर लागले होते.चवीला पण चांगले होते. पिवळे धम्मक अशा रंगाचे ते बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटायचे. पण ते काढायचे कसे? त्या झाडावर चढताना बरेचजण घाबरून जायचे, गावठी रायवळी आंबे होते, पण हापूस आंब्याच्या पेक्षाही गोड लागायचे.
अंन्को नी शंको हे दोन मित्र, कुठे जायचं झाले तरी एकत्रित जात असत. अंक्यापेक्षा शन्को दोन वर्षांनी मोठो होतो, तो थोडो कावेबाज आणि धूर्त,चलाख होतो. अंन्को साधो होतो त्याची स्तुती केली की तो भारावून जायचो, ह्या शंक्याक माहिती होता. शंक्यान एक आयडिया केल्यानं म्हणालो, "अंक्या तू या झाडावर चढुच शकत नाय, भले भले हरले हत, म्हणून तर हे आंबे कोण काढू शकले नाय." असा शंक्याचा ऐकून अंक्याक इलो राग. आणि रागासरशी खरच तो त्या अवघड आंब्याच्या झाडावर सरसर चढलो आणि आंब्याच्या फांद्या हलवुक लागलो,
अंन्को फांद्यांवर जाऊन गदागदा हलवायचो. पिकलेले आंबे टपटप पडायचे.
आधीच खाली साचलेलो आंब्याच्या पानांचो पतेऱ्याचो एक ढीग केलेलो होतो.
शंको लबाड हळूच पडलेले आंबे पत्तेऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सारून लपवून ठेवायचो आणि थोडेसे आंबे गोणीत भरायचो. अंन्को फांद्या हलविण्यात दंग, तर शंको आंबे लपविण्यात दंग.
जेवढे आंबे पडले असतील तेच्या पावपट पण गोणीत नव्हते. अंन्को बिचारो फांदी हलवून हलवून थकलो, पिकलेले सगळे आंबे त्याने खाली पाडल्यान आणि एकदा आंब्यावरून उतरलो. बघता तर काय गोणीत आंबे थोडेच दिसले. अंन्को म्हणता इतकेच कसे रे ? पाडलेलय तर भरपूर होते. शंको लबाड म्हणता कसो, "नाय रे सगळे गोणीतच भरले हत हे काय!" अंक्याक आपला खरा वाटला नि होते तेवढया आंब्याची वाटणी केल्यानी घराक गेले, शंको हळूच एकटो नंतर पुन्हा आंब्याच्या ठिकाणी गेलो. आंब्याच्या खाली एका बाजूला पतेऱ्याच्या ढीगात दडवून ठेवलेले आंबे गोणीत भरून पुन्हा घराक घेवन गेलो.
अंन्को होतो कमाल पण शंको मात्र झालो मालामाल
१५ एप्रिल २०२२



0 टिप्पण्या