स्वामी विवेकानंद शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

 स्वामी विवेकानंद शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती




डोंबिवली ( शंकर जाधव ) स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळ नगर माध्यमिक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका  विद्या कुलकर्णी , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भीम वंदनेने झाली .अंकिता जमदाडे, नीलम खडसे ,अर्पिता खिल्लारे ,अक्षरा मोरे या विद्यार्थिनींनी भीम वंदना सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी मॅडम ,ज्येष्ठ शिक्षिका स्वप्नाली दळवी  व ज्येष्ठ शिक्षक  धांगडा सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा नाठे यांनी केले .कु.वेदिका मांडे व  वैष्णवी सुंभे या  विद्यार्थिनींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडले. पुष्पा  नाठे  यांनी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित  प्रश्नमंजुषा आयोजित केली होती .तेजस्विनी पवार, खुशी वाघ ,सृष्टी मुंगले ,सविधान लोंढे व यश सोनावणे या विद्यार्थ्यांनी  प्रश्नमंजुषतील प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसे मिळवली .शिक्षक प्रतिनिधी मनोगत कविता पाटील मॅडम यांनी केले .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण, राजकीय कारकीर्द ,सामाजिक कार्य याची माहिती त्यांनी अभ्यासपूर्वक सादर केली .शाळेच्या मुख्या.विद्या कुलकर्णी  यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम किती श्रेष्ठ होते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञान लालसेने प्रेरित होऊन वाचनास प्राधान्य द्यावे .असा संदेश मुख्याध्यापकांनी या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमासाठी सुशोभित असे फलक लेखन श्री धांगडा सर यांनी केले होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती मोनिका पाटील यांनी केले. गणेश पाटील  पोतदार ,  जाधव व शिक्षकेतर कर्मचारी   कृष्णा व श्री राम यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या