राजेंद्र सावंत यांना उदगीर(लातूर) येथे गुणगौरव पुरस्कार 2022 ने सन्मानित.




वृत्त:रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान,उदगीर,जिल्हा-लातूर(महाराष्ट्र) आयोजित ६वे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 2022 च्या सोहळ्यात महाराष्ट्र राज्यात  सामाजिक,कला,साहित्य,पत्रकारीत्या अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणिजनांना दिग्विज राजकीय,सिने,टीव्ही अभिनेते यांच्या शुभहस्ते दि-10 एप्रिल 2022 रोजी उदगीर,जिल्हा-लातूर,रघुकुल मंगल कार्यालय येथे मानपत्र,सन्मान चिन्ह,शाल देऊन सन्मानित करण्यात आले.टिटवाळा येथे वास्तव्यात असलेले आणि महाराष्ट्र राज्यात अष्टपैलू व्यक्तीमहत्व म्हणून ओळख असलेले राजेंद्र मधुकर सावंत ह्यांच्या सामाजिक आणि कला,साहित्याची दखल रंगकर्मी साहित्य,कला,क्रीडा प्रतिष्ठान,उदगीर यांनी घेऊन सन्मानित केले.सदर पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित मा राज्य मंत्री श्री ना.आ.संजयजी बनसोडे,नाट्य,सिने विनोदी जेष्ठ अभिनेते मा विजयजी कदम,मा अभिनेते श्री सुरेशजी विश्वकर्मा(फिल्म-सैराट)यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. राजेंद्र सावंत यांचे कार्य खूप कौतुकास्पद असून गेले १३ वर्ष ता-कल्याण,मुरबाड भागात जंगलात वसलेल्या आदिवासी पाड्यात निस्वार्थ सेवा देत आहे तसेच कला,साहित्य,नाट्य,शॉर्ट फिल्म( दिग्दर्शन,निर्माते),पत्रकारीत्या अशा क्षेत्रात प्राविण्य मिळवून ४०० च्या पुढे सन्मान पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांच्या कार्याची उंची रंगकर्मी साहित्य,कला,क्रीडा प्रतिष्ठाने,उदगीर यांनी पाहून "विशेष गुणगौरव पुरस्कार 2022  चा देऊन सन्मानित करण्यात आले आज राजेंद्र सावंत यांच्या पुरस्काराचे कौतुक महाराष्ट्र राज्यातून होतांना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या