आजदे पाड्यात ड्रेनेजचे पाणी, नागरिक हैराण




डोंबिवली ( शंकर जाधव )  येथील डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कलसमोरील आजडेपाडा रस्त्यावर अनेक दिवसांपासून  ड्रेनेजचे पाणी वाहत आहे.परिसरात दुर्गंधी, पायी चालण्यास त्रास यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.आजदेपाडा येथील लोकवस्ती वाढली असल्याने वाहतूक वाढली आहे.आजदेपाड्यात लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे.मात्र रस्त्यावरील दुर्गंधीच्या पाण्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.ही परिस्थिती अनेक दिवसांपासून असल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. पालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या