नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी विधानपरिषद सभापती रामराजेंना साकडे

 नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी विधानपरिषद  सभापती

रामराजेंना  साकडे 



* मुद्रा  महिला  बचत गटाने  दिले  निवेदन 


मुंबई - मुंबईतील नायगाव- दादर येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास हा  त्रुटी व जाचक अटी वर मार्ग काढत जलद गतीने होण्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती विधानपरिषद महाराष्ट्र रामराजे नाईक निंबाळकर यांना दादर नायगाव विभागातील मुद्रा महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती  माने यांनी निवेदन देऊन साकडे घातले.


दादर,नायगाव बी,डी.डी. चाळींचा पुनर्विकास हा गेली २० वर्ष रखडलेला आहे.  मागील वर्षापूर्वी या प्रकल्पाचे भुमिपुजन  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  व गुहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड  यांच्या उपस्थित पार पाडला होता. परंतु प्रकल्पात असलेल्या जाचक अटी व त्रुटी ,

समस्यामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे.तसेच याविषयी बीडीडी चाळकरी संभ्रमात आहेत. ह्या कारणांणसाठी नायगाव विभागातील मुद्रा महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती माने यांच्या अध्यक्षतेखालील सातारा जिल्हा विकास समिती (ट्रस्ट )  मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या   उपस्थितीत  विधानपरिषद सभापती  रामराजे नाईक निंबाळकर  यांची विधानभवनात भेट घेऊन बीडीडी चाळींचा पुनर्विकास हा  त्यातील त्रुटी व जाचक अटीवर मार्ग काढत जलद गतीने होण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी बीडीडी चाळींच्या संदर्भात चर्चा करुन तात्काळ गुहनिर्माण मंत्री  जिंतेद्र आव्हाड यांना देण्यासाठी पत्र दिले. तसेच या प्रकल्पाच्या संदर्भात असलेल्या समस्या त्रुटी व जाचक अटी दूर करून हा प्रकल्प जलद गतीने होण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सकारत्मक आश्वासन  रामराजे  नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.यावेळी सातारा जिल्हा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोज माने, शिशु विकास मंडळाचे सदस्य प्रशांत माने ,अभिजीत सावंत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या