डोंबिवलीत भररस्त्यात महिलेवर चाकूने वार...


डोंबिवली ( शंकर जाधव )  भररस्त्यात  पतीने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना डोंबिवली पूर्व येथील दत्त नगर परिसरात  घडली. हल्लेखोर पतीविरोधात डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 




    पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, सोमनाथ देवकर (४५) असे  हल्लेखोर पतीचे नाव आहे.त्याची पत्नी वंदना देवकर हिच्या फिर्यादिवरून गुन्हा नोंदविला आहे.दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ सोमनाथ व पत्नी वंदना राहतात.सोमनाथ हा बेरोजगार असून तो वारंवार पत्नीवर संशय व  घरातील पैसेही चोरते असा आरोप करत होता.पत्नी वंदनाने पतीला अनेक वेळेला समजवण्याचा प्रयत्न केला.पण सोमनाथ ऐकत नसल्याने वैतागलेल्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास वंदना ह्या पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घरासमोर रिक्षात बसल्या.अचानक पाठीमागून आलेल्या सोमनाथने वंदना यांच्या मानेच्या खाली, पायावर आणि हातावर वार केले.गंभीर जखमी झालेल्या या महिलेला रिक्षाचालकाने रुग्णालयात उपचारासाठी नेत होता. गस्त घालत असलेल्या पोलिसांनी रिक्षात महिलेला पाहिल्यावर रिक्षा थांबवून रिक्षाचालकाकडे विचारणा केली.रिक्षाचालकाने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी जखमी महिलेला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिस हल्लेखोर पतीचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या